किसान शिक्षण प्रसारक मंडळच्या नवनिर्वाचित सर्व संचालकांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एम. एस. जाधव व सचिवपदी दीपक चिखले यांची तर उपाध्यक्षपदी भगवान बिरादार शिरोळकर, कोषाध्यक्षपदी शहाजी पाटील कल्लूरकर यांच्यासह सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ उदगीरच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष एम. एस.जाधव, सचिव दीपक चिखले, उपाध्यक्ष भगवान बिरादार शिरोळकर, कोषाध्यक्ष शहाजी पाटील कल्लूरकर, संचालक नारायण वट्टमवार, विपुल बोरोळे व श्रीमती क्रांती पाटील यांचा यथोचित सत्कार विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर येथे मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यावर्धिनी हायस्कूलचे माजी उप मुख्याध्यापक पोशेट्टी ए.पी., पर्यवेक्षक बांगे व्ही. एम., चंद्रकांत जाधव, बंडु पाटील, वलाकट्टे आर. बी. व सौ.सोनाली पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
