बिर्ला इंग्लिश स्कूल चे आंतरराष्ट्रीय चिञकला स्पर्धेत घवघवीत यश

बिर्ला इंग्लिश स्कूल चे आंतरराष्ट्रीय चिञकला स्पर्धेत घवघवीत यश

लातूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय चिञकला स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लातूर येथील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत जगातील ३ रा नंबर प्राप्त केला.

आंतरराष्ट्रीय चिञकला स्पर्धा आयोजित “रंगोत्सव २०२२-२३ हि स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये बिर्ला इंग्लिश स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये ८ पदक तसेच ६ ट्रॉफी आणि ४ उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाली. ज्यामध्ये ९वी वर्गातील कु.दर्शना श्रीराम राठोड या विद्यार्थीनीने या स्पर्धेत वैयक्तिक जगात ३रा नंबर प्राप्त केला. आणि याच स्पर्धेत जगातील सर्वोत्तम सहभाग नोंदविणारी शाळा म्हणून बिर्ला इंग्लिश स्कूलला विशेष पुरस्कार प्राप्त झाला..या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री.अनिल पॉल यांनी कौतुक करून त्यांना सन्मानित केले. तसेच या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल शाळेचे चिञकला शिक्षक चि.महेश शिंदे सरांना विशेष सन्मान देण्यात आला. शाळेच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे सर्वञ कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!