कुंभारी येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान

कुंभारी येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान

लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण मतदार संघातील कुंभारी तालुका रेणापूर येथे काॅग्रेसचे हात से हात जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील संदेशाच्या पत्रकाचे व लातूर ग्रामीण चे आ.धिरजभैया देशमुख यांनी कुंभारी गावास आनलेल्या 20 लक्ष रुपये विकास निधीच्या पत्रीकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रमोद आबा जाधव, सेवा दल काँग्रेस चे अध्यक्ष हनमंत तात्या पवार, अनुसूचित विभागाचे तालुका अध्यक्ष अजयजी चक्रे, विद्यार्थी काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, ओ बी सी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल पवार कुंभारी गावचे चेअरमन नृसिंह कातळे, सरपंच संजय भुतकर, उपसरपंच संजय मरलापलले, चेअरमन बाळासाहेब कातळे, व्हा चेअरमन सूर्यकांत फड यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!