जनतेला दिलेले शब्द पुर्ण करणार – आ.संजय बनसोडे

जनतेला दिलेले शब्द पुर्ण करणार - आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : गोर गरीब जनतेला दृष्टी देण्याचे महान कार्य उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्रमंदीरात केले जाते.या नेत्ररूग्नालयामध्ये मराठवाड्यातुन नव्हे तर शेजारी असेले कर्नाटक, अंध्रप्रदेश, तेलंगना या तिन राज्यांच्या सीमेवर असलेल्या रूग्नालयामध्ये नेत्र रुग्ण शस्त्रक्रियेसाठी येत आहेत.उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर हे गोर गरीब जनतेचे हाॅस्पीटल आहे. असे सर्व सामान्य नागरीकांया मुखातून ऐकायला मिळते. यासाठी बाहेरू येणारे नागरीकांसाठी मोफत राहाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी राज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदार संघाचे विकास पुरूष म्हणून ओळखले जाणारे आ.संजयभाऊ बनसोडे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शरदचंद्र पवार धर्मशाळेसाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिले आहेत.या भव्य अशा शरदचंद्र पवार धर्मशाळे करिता शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे.जेष्ट नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरदचंद्र पवार धर्मशाळेचे भूमीपूजन करण्यात आले होते.व पहीला टप्पा 50 लक्ष व 25 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे, ते काम सुरू झाले होते.उर्वरित 50 लक्ष निधी परवा महाराष्ट्र शासना कडून मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यातील कामाकरिता 50लक्ष रुपयांच्या निधीतून व महाराष्ट्र राज्य शासनाकडे विशेष पाठपुरावा करून उपलब्ध करुन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्याबद्दल गोर गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील. यात शंका नाही.या उपलब्ध निधीमुळे उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया,सचिव प्रदीप बेद्रे,प्रा.महेश बसपुरे,सुरेश देबडवार, अजय मलगे, सर्व लायन्स परिवार तसेच परिसरातील नेत्ररुग्ण व जनतेतर्फे अभिनंदन करून आभार मानले आहेत.

About The Author

error: Content is protected !!