जीवनातील पहिला रोजा वयाच्या 7 व्या वर्षी पुर्ण केल्याने उल्फत शेख चे गावातील शेजाऱ्या कडुन कौतुक व अभिनंदन होत आहे

जीवनातील पहिला रोजा वयाच्या 7 व्या वर्षी पुर्ण केल्याने उल्फत शेख चे गावातील शेजाऱ्या कडुन कौतुक व अभिनंदन होत आहे

वाढवणा बु (हुकूमत शेख) : इस्लाम धर्मातील पाच अरकान पैकी एक अरकान रोजा हा 7 वर्षा पुढील सर्व मुले, मुली,महिला, पुरुषांना रोजा फर्ज असुन रोजा ठेवणे बंधनकारक अनिवार्य आहे. म्हणुन आज दि.25 शनिवार चा पहिला रोजा के. प्रा. शाळा वाढवणा येथील दुसरी वर्गात शिक्षण घेणारी विध्यार्थिनी उल्फत हुकूमत शेख यांनी शनिवार रात्री 4:30 वाजता रात्री सहेरी केली, व दिवसभर चौदा तासाचा रोजा दिवसभर निरंकार अल्लाने दिलेल्या हुकुमा प्रमाणे, शरीयत प्रमाणे वयाच्या 7 व्या वर्षी रमजान चा रोजा राहून पुण्याचे काम केली असल्याने, रोजा इफ्त्यारी साठी त्याला नवीन कपडे, फुलांचा हार घालुन शनिवार सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला खजूर तोंडात घालुन (इफ्त्यारी )करून रोजा खोलला. उल्फत शेख ने 7व्या वर्षीचं रोजा राहून एक फर्ज अदा केला, म्हणुन शेजारी व गावातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन व कौतुक करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!