फुल टू हंगामा मराठी चित्रपटा व्दारे मिसेस इंडिया डाॅ रम्यता प्रफुल्ल करतेय रूपेरी पडद्यावर पदार्पण

फुल टू हंगामा मराठी चित्रपटा व्दारे मिसेस इंडिया डाॅ रम्यता प्रफुल्ल करतेय रूपेरी पडद्यावर पदार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे यांच्या फुल टू हंगामा या मराठी चित्रपटा व्दारे सुप्रसिद्ध माॅडेल मिसेस एशिया पॅसिपिक व मिसेस इंडिया विजेती डाॅ रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर झारखंड) मराठी चित्रपटाव्दारे रूपेरी पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत आहे, साहित्य क्षेत्रात सर्वांना परिचित असलेले,छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठी भाषेत काव्य अनुवादित करणारे व लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपट यशस्वीपणे केल्यानंतर प्रथमच मुख्य अभिनेता म्हणून शरद गोरे आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत,डाॅ.रम्यता या नागपूरच्या कन्या असून त्या मिसेस झारखंड,मिसेस इस्ट इंडिया, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिपिक विजेत्या आहेत,त्यांनी नागपूर येथून 2014 साली MBBS चे शिक्षण पूर्ण केले,सध्या त्या जमशेदपूर झारखंड येथे वास्तव्यास आहेत, डाॅ.रम्यता व्दारे नखशिखांत सुंदर,अभिनयात निष्णात उच्चशिक्षित चेहरा मराठी चित्रपट सृष्टीस मिळाला आहे,गीतलेखन शरद गोरे व दीपक गायकवाड यांनी केले आहे तर संगीत शरद गोरे यांनी दिले आहे व स्वरसाज कुणाल गांजावाला,कविता राम,राजेश्वरी पवार यांनी चढिवला आहे.

प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला, रमाकांत सुतार,प्रकाश धिंङले, सुनील साबळे, अमोल कुंभार, शुभांगी देवकुळे आदी कलाकार हि या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करीत आहेत, रवींद्र लोकरे हे छायाकंन केले आहे, श्रध्दा बनकर यांनी रंगभूषा तर प्रसाद भिलोरे यांनी कला दिग्दर्शन केले आहे किशोर दळवी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे, माढा, करमाळा, सोलापूर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

About The Author

error: Content is protected !!