प्रगतशील स्त्रियांना समाजाने सन्मानाने जगवावे – मा मंत्री बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्री शक्तीच्या अनोखा महिमा असल्याचे सांगून पुरुषांपेक्षा स्त्रियांच्याकडे शांती संयम आणि विद्वत्ता खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मानवी समाजाने सर्जनशिल स्त्रियांना अत्यंत सन्मानाने जगवा असे जाहीर आव्हान माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. दिनांक 19 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा अहमदपूर च्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील समितीच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृतुत्वान महिलांचा समाज प्रबोधनी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या देण्यात येत असतो, या गुणगौरव सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट रमेश राठोड पुणे प्रमुख अतिथी म्हणून वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सत्यनारायणजी काळे मराठा सेवा संघाचे उपजिल्हा अध्यक्ष गोविंद शेळके, मोहिब कादरी, मा नगरसेवक अनुराधा नळेगावकर, महेश बँकेच्या संचालिका संगीता खंडागळे, डॉ ललिता किनगावकर, मुख्याध्यापिका सुषमा पाटील. डॉ पद्मजा पाटील , उद्धवजी इप्पर सह मान्यवरांची उपस्थिती होती या समयी पुण्याचे प्रसिद्ध अडवोकेट रमेश राठोड म्हणाले की मुलींच्या बापाने हुंडा देऊ नका ते पैसे मुलीच्या शिक्षणावर खर्च करा महिलांनी संयम शांती ठेवल्यास भांडणे उद्भवत नसल्याचे सांगून महिलांनी कायद्याचा गैरवापर करू नये अंत काळापासून महिलावर अनेक अत्याचार होत आलेले आहेत पण महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे कायद्याच्या चौकटीमुळे महिलांना अनेक सुरक्षा देण्यात आले. कायदे अंतर्गत कठोर शिक्षा होत आहेत. शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे अंधश्रद्धा ला बळी पडणाऱ्या महिला व अत्याचार कमी प्रमाणात होत आहेत. आता नवीन मेंटली हरासमेंट प्रत्येक परिवारामध्ये होत आहे पुरुष व महिला यांच्यामध्येआलेला आहे अनेक महिलांना आपल्याविषयी कायदे काहीच माहित नाहीत कायद्याचा अभ्यास करून आपले सुरक्षा आपण करू शकतो सर्व तरुण मुला मुलींना महिला यांना लैंगिक शिक्षणाची काळाला आता गरज आहे. असे मत पुणे येथील प्रसिद्ध विधीतज्ञ रमेश राठोड यांनी यावेळी व्यक्त केले . विधवा महिलेसाठी विशेष कार्य करणाऱ्या नगरसेविका अनुराधा नळेगावकर आणि उपक्रमशील शिक्षक राम तत्ता पुरे यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसेश्वर पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला साहित्यिक डॉ ललिता गादगे औरंगाबाद ,प्रभाताई अजगरे नागपूर, डॉ अस्मिता बालगावकर सोलापूर, कोमल सोमारे मुंबई ,संगीता माले, पानगाव, विमला आकणगिरे रेणापूर, कल्पना हेळमकर सेलू ,इनामदार राधिका कळमनुरी, अनुराधा वाघमारे हरंगुळ लातूर, रेखाताई हाके अहमदपूर, शकुंतला येणगे अहमदपूर, अंजली वाघम्बर अहमदपूर, समीक्षा कांबळे अहमदपूर, डॉ अंजली उगीले अहमदपूर, शोभा अकृरुपे. अहमदपूर, कामाक्षी पवार, कविता उगिले नागझरी, कदम रेखा अहमदपूर ,सारिका गुंडले, शोभा घोडके यांचा मान्यवरांच्या हत्ते सन्मान करण्यात आला प्रस्ताविक प्रा रत्नाकर नळेगावकर यांनी तर सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार आणि प्रधान सचिव मेघराज गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व श्री अडवोकेट या एन एम देमगुंडे चंद्रशेखर भालेराव,अजहर बागवान, प्राध्यापक राहुल गायकवाड, दीपक गायकवाड ,सुरेखा उपरवाड ,आशा रोडगे, वैशाली कदम, संध्या लामतुरे, सुप्रिया पांढरे, पूजा गायकवाड, इंजिनीयर पल्लवी गायकवाड, शीला शिंदे, दीपक कांबळे, तुकाराम लोकरे संदीप कदम इत्यादी.
