खा.राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या विरोधात अहमदपूर काँग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन

खा.राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या विरोधात अहमदपूर काँग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) :खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशात प्रचंड प्रतिसाद मिळाला.लाखो लोक या आंदोलनात सामील झाले. त्यांना मिळणारा हा प्रतिसाद पाहून केंद्र सरकार घाबरले आहे.त्यामुळे एका जुन्या खोट्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवून राहुल गांधी यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे.या विरोधात देशभर काँग्रेस पक्ष आणि लोकशाही मानणारे सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे या निर्णयाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आल.या आंदोलनात सकाळी 11 दुपारी 3 पर्यंत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य जनता सहभागी झाली होती.या आंदोलनामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,जेष्ठ नेते भारत रेड्डी, माजी सभापती चंद्रकांत मद्दे,कालिमोदीन अहमद, सिराज जहागीरदार,हेमंत माकने निलेश देशमुख, विकास महाजन, शिवाजीराव जंगापल्ले, श्रीकांत बनसोडे, उत्तमराव टेकाळे,बापू शिंदे, अनिल शेळके, बंडू येरमे, प्रदीप डावरे,रवी महाजन, अक्षय देशमुख,केदार काडवादे, प्रकाश ससाने, दयानंद वाघमारे,बाबासाहेब देशमुख, अक्षय काडवादे, अंतराम कदम, नरसिग परतवाघ, किशोर मोरे, नागेश लांजे, रुपेश कांबळे, गजानन सावंत,अतुल माकने, संभाजी माकणे,दिनकर कदम, अक्षय लांडे, धीरज काळे त्यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

About The Author

error: Content is protected !!