विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे – डॉ .अशोक सांगवीकर यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे - डॉ .अशोक सांगवीकर यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : सद्यस्थितीला जगामध्ये विद्यार्थी सोशल मीडियाच्या ओघात भरकटलेला असल्याचे सांगून त्याचे जीवन सुस्थितीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवून आपले जीवन आदर्श करावे असे जाहीर आवाहन टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर यांनी केले. ते दि. 24 रोजी मराठवाडा साहित्य परिषद आणि यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत विद्यालयाच्या सभागृहात लातूरचे डॉ.व्यंकट कोलपुके यांच्या सत्य घटनेवर आधारित नाटक ‘संघर्ष ‘या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट भगवानराव पौळ तर प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे सर्जन डॉ. डी एन चिंते, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह द.मा. माने, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी लेखक, डॉ.व्यंकट कोलपुके यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा कळवा , व त्या काळात सर्वसामान्यावर अपरिमित, अन्याय, अत्याचार झाल्याचे सांगून मुलांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे अग्रक्रमाने वाचन करावे असे सांगून अभ्यासासोबत अवांतर वाचन करावे असे सांगितले. या समयी डॉ. अशोक सांगवीकर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते डॉ. व्यंकट कोलपुके लिखित “संघर्ष” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी सर्जन डॉ.डी एन चिंते यांचे मनोगत पर भाषण होऊन सोहळ्याचे अध्यक्षीत्र समारोप एड. भगवानराव पौळ यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार प्रा.अनिल चवळे यांनी मांनले. कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतिकारकांना अभिवादन करून करण्यात आला. यावेळी डॉ. वकील, प्राध्यापक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पुढारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी व यशवंत विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!