किलबिलचे सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

किलबिलचे सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : वार्ताहर येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षात आयोजित केलेल्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत एकूण 36 सुवर्ण पदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेमध्ये गणित, विज्ञान व इंग्रजी अशा तीन विषयांच्या ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते.नुकताच सायन्स विषयाचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये इयत्ता तिसरी वर्गातील पांचाळ मयुरी, आलापूरे श्लोक,रणखांब तेजस,शेख अश्मिरा, भगत रुद्र, हलगरे आदर्श, जमादार आरोही, वाघमारे शौर्य, मेनकुदळे स्वरा, स्वामी जानवी, आगलावे स्वराज इयत्ता पाचवी मधील जोशी अवधूत, लोकरे सतेज, देशमुख आर्यन, काळे श्रेयश, माने अविर, पुष्कर आशुतोष, पाटील राजेश्वरी, चामले प्रथमेश, शेळके दत्तात्रय, लांडगे, ओंकार शेख जारा इयत्ता सहावी मधील दावणगावे श्रेया, राठोड मैथिली, देशमुख आयफाज, स्वामी श्वेता, माही कांबळे, विधी भुतडा, मुदगडे प्रज्वल, लोंढ प्रेरणा इयत्ता सातवी मधील मतलाकुटे रितेश, काडवदे अक्षरा, गादेवार जानवी तर आठवी मधील शिंदे श्वेता, बारोळे आर्यन, देशमुख अल्तमश इत्यादी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले सदरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक शितल जगताप, बळवंत डोंगरे, श्रीधर आडीके, धनेश्वर आगलावे इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्था सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले आदींनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!