155 दिवसात 5 लाख 37 हजार मेट्रिक टन ऊस गाळप- आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : सिद्धी शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड उजना 2022-23 गळीत हंगाम सांगता कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबासाहेबजी पाटील उपस्थित होते.यावेळी 155 दिवसात 5 लाख 37 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले. या कामगिरीबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे, ऊसतोड कामगार, कारखान्यातील सर्व कर्मचारी अधिकारी आदी सर्वांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऊसतोड कामगारांचा सत्कार करत कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी बोनस जाहीर केला.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब, शिवानंद तात्या हेंगणे, माधवराव जाधव, युवा नेते सुरजभैय्या पाटील, व्हाईस प्रेसिडेंट पी.जी होनराव, जनरल मॅनेजर एस.आर पिसाळ, डिस्टिलरी मॅनेजर शिंदे, जनरल मॅनेजर केन पी.एल मिटकर फॅक्टरी मॅनेजर गुडेकर तसेच ऊसतोड कामगार, शेतकरी बांधव, कारखान्यातील सर्व कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
