काळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभरराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत प्रवेश
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी संपर्क कार्यालयात आज जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत काळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभरराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला मतदारसंघात आणखीन मजबूत बळकटी मिळणार आहे असे मनोगत आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त करून त्यांचे स्वागत व सन्मान केला. या वेळी माजी सभापती उपजिल्हाध्यक्ष शिवानंद हेंगणे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी जि. प. सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, अविनाश देशमुख, डी के जाधव, ऍड सादिक शेख, अभय मिरकले, अनिल बेंबडे, गोपीनाथ जोंधळे,सतीश नवटके, महेश देवणे,नाकसाखरे, आशिष तोगरे, फेरोज शेख, दयानंद पाटील, हुसेन मणियार, इलियास सय्यद, चंद्रशेखर भालेराव, गिरीधर पौळ, अशोक सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
