हातावरचे पोट असलेल्यांना इनरव्हील क्लब च्या वतीने इनरव्हील ब्रॅण्डिंग छत्र्यांचे वाटप

हातावरचे पोट असलेल्यांना इनरव्हील क्लब च्या वतीने इनरव्हील ब्रॅण्डिंग छत्र्यांचे वाटप

उदगीर (एल. पी. उगीले) उदगीर शहरातील रस्त्यावरील भाजी विकणारे तसेच रस्त्याच्या कडेला बसून चप्पल दुरुस्त करणारे, रोजी रोटी साठी उन्हातान्हाची पर्वा न करता कष्ट करणाऱ्या लोकांना “मैत्रीची सावली” या उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब उदगीर च्या वतीने इंनरव्हील क्लब ब्रँडिंगच्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून प्रमुख होत्या सहसचिव विधीज्ञ नीलिमा पारसेवार, याप्रसंगी प्रमुखाअतिथी मध्ये इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चेंबूले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष सौ मानसी चन्नावार, सदस्य पूजा गर्जे, सो मीरा गुरुडे, प्रिया नारखेडे, नेहा जैन, वैभवी पटवारी, तुलसी देशमुख, अलका येरोळकर इत्यादी उपस्थित होते.
मैत्रीची सावली या उपक्रमांतर्गत हातावरचे पोट घेऊन कष्ट करणाऱ्यांना, आपण काहीतरी अर्थसहाय्य करावे, असे वाटून त्या स्वाभिमानी कष्टकऱ्यांसाठी थोडेसे सहकार्य म्हणून मोठ्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले आहे. यातून कष्टकऱ्यांचा स्वाभिमान जपला जावा, आणि इनरव्हील क्लब जी मातृ शक्ती या समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून काम करत आहे. त्या भावनेचीही कदर व्हावी. अशा उदात्त हेतूने राबवलेल्या या उपक्रमाचे उदगीर शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!