साहित्यातील खरा नायक शरद गोरे फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे नायकाच्या भूमिकेत
लातूर(एल.पी.उगीले) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे यांच्या “फुल टू हंगामा” या मराठी चित्रपटाव्दारे
मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे साहित्य संवर्धनाचे कार्य अविरतपणे करनारे, त्यांच्या नेत्तृवात अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन;छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन;छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,महात्मा फुले साहित्य संमेलन,ग्रामीण मराठी साहित्य संमेलन,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, बालाघाट मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन सह विविध प्रकारची 156 साहित्य संमेलन देशभरात
विविध ठिकाणी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत,असे अव्दितीय साहित्य कार्य करणारे साहित्य विश्वातील शरद गोरे हे एकमेव व्यक्ती आहेत,प्रिये,प्रेम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या की हत्या,धर्माची दारू अन जातीची नशा,कथा पोपटरावांची,बालाघाटाचा सिंह,मराठी भाषेचा समग्र इतिहास
आदी ग्रंथासह एकुण 10 ग्रंथाचे त्यांनी
लेखन केले आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ बुधभूषण त्यांनी मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे, युगंधर प्रकाशन संस्थेच्या वतीने त्यांनी आजवर 147 पुस्तके प्रकाशित केली आहेत, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा फुले आदी विषयांवर हजारो व्याख्याने दिली आहेत, रणांगण एक संघर्ष,उष:काल,प्रेमरंग,एक प्रेरणादायी प्रवास सूर्या,ऐतवी,आदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक व संगीतकार म्हणून काम केले,हे यशस्वीपणे चित्रपट आहेत, द शिवाजी मॅनेजमेंन्ट गुरू, या नाटकासह प्रेम,तुझ्याविन या अल्बमचे गीत लेखन करून ते संगीतबध्द केले आहेत, लेखक, दिग्दर्शक,गीतकार, संगीतकार,निर्मिता असलेले शरद गोरे आता फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत, तुफान विनोदी असलेल्या या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखेबद्दल रसिकांना कमालीची उत्सुकता लागली आहे,सुप्रसिद्ध माॅडेल मिसेस एशिया पॅसिपिक व मिसेस इंडिया विजेती डाॅ रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर झारखंड) या मराठी चित्रपटाव्दारे रूपेरी पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत आहे, डाॅ.रम्यता या नागपूरच्या कन्या असून त्या मिसेस झारखंड,मिसेस इस्ट इंडिया, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिपिक विजेत्या आहेत,त्यांनी नागपूर येथून 2014 साली MBBS चे शिक्षण पूर्ण केले,सध्या त्या जमशेदपूर झारखंड येथे वास्तव्यास आहेत, डाॅ.रम्यता व्दारे नखशिखांत सुंदर,अभिनयात निष्णात उच्चशिक्षित चेहरा मराठी चित्रपट सृष्टीस मिळाला आहे, शरद गोरे व डाॅ रम्यता प्रफुल्ल नवीन जोडी मराठी चित्रपट सृष्टीस मिळाली आहे,गीतलेखन शरद गोरे व दीपक गायकवाड यांनी केले आहे. तर संगीत शरद गोरे यांनी दिले आहे. स्वरसाज कुणाल गांजावाला,कविता राम,राजेश्वरी पवार यांनी चढिवला आहे,
प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला, रमाकांत सुतार,प्रकाश धिंडले, सुनील साबळे, अमोल कुंभार, कृष्णा खबाले,आदी कलाकार हि या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करीत आहेत, रवींद्र लोकरे यांनी छायाकंन केले आहे, श्रध्दा बनकर यांनी रंगभूषा तर प्रसाद भिलोरे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. किशोर दळवी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे, माढा, करमाळा, सोलापूर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.
