सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांची दमदार कामगिरी; साडेपाच लाखाचा गुटखा व मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांची दमदार कामगिरी; साडेपाच लाखाचा गुटखा व मुद्देमाल जप्त

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील हाडोळती येथे ५ लाख ३८ हजार ४१० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करून चार व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांवर ही कारवाई केली आहे.
तालुक्यातील हाडोळती येथे बालाजी बाबुराव कोंडगीरे, आकाश बालाजी कोंडगीरे, जिलानी बाबु सय्यद, रमेश लक्ष्मण पवार सर्व रा हाडोळती ता. अहमदपूर जि. लातूर या चार आरोपींनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला वेगवेगळ्या कंपनीचा व. महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व गुन्हयात वापरलेली इंडीका विस्टा कंपनीची कार नंबर एमएच 24 / एएफ / 1390 जुनी वापरातील
असा एकूण ५ लाख ३८ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुर्यकांत बबनराव कलमे वय 37 वर्षे, पोहेकॉ
यांच्या तक्रारीवरून वरील चार आरोपी विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुरनं. ७३/ २०२३ कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केला असून चार आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहायक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव, पोलीस अमलदार कलमे, धर्मपाल गुट्टे, पोह शेख,ड्रायव्हर कांबळे,यांच्या उपस्थितीत पार पडली असुन पोह संमुखराव वैजेनाथ, पोलीस अमलदार मारूती शिंदे, आर.एस राजगीरवाड, आदींनी सहकार्य केले
पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत

About The Author

error: Content is protected !!