न.प.ला कंटाळून, शिवसेना उप शहर प्रमुखाने स्वच्छ केली नाली!
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागास, कर्मचाऱ्यांना शहरात वाढलेले घाणीचे साम्राज्य कमी करण्यासाठी वारंवार लेखी, तोंडी सूचना देऊनही नगर परिषदेमार्फत स्वच्छता होत नाही. म्हणून अखेर न. प. प्रशासनाला, नियुक्त कर्मचाऱ्यांना कंटाळून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप शहर प्रमुख शिवकुमार बेद्रे यांनी स्वतःच मारवाड गल्लीतील नाली स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले.
याविषयी थोडक्यात माहिती अशी की, शहरात मागील पाच-सहा महिन्यापासून तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले नाही. परिणामी सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढून, परिसरात दुर्गंधी वाढली. डासांचा प्रादुर्भाव वाढला. याचा थेट परिणाम लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांना डेंगू, मलेरिया यासारख्या आजारांच्या सामोरे जावे लागत आहे . करिता उप शहर प्रमुख शिवकुमार बेद्रे यांनी वारंवार नगरपरिषदेला फोनवरून, लेखी, तोंडी विचारणा केली असता, माणसं नाहीत, त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत, टेंडर बंद आहे असे उत्तर देण्यात आले. म्हणून नगरपरिषदेला कंटाळून मारवाड गल्ली व परिसरातील नाणी साफ करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालाजी रेड्डी यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
