रमाई ग्रुपच्या वतीने उषा कांबळे यांचा सत्कार
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथील माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसच्या नेत्या उषा कांबळे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस पदी करण्यात आल्याबद्दल उदगीर येथील रमाई ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. उषा कांबळे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मोठे जबाबदारी संपवली आहे. प्रदेश सरचिटणीस सोबतच त्यांना सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी करण्यात आले आहे. ही बाब उदगीरकरांसाठी निश्चित अभिमानाचे आणि आनंदाचे आहे. त्यामुळेच रामाई ग्रुपच्या वतीने डॉ. माने, डॉ. काळे, डॉ. धसवाडीकर, प्रा. शिंदे, प्रा. मीनाक्षी कांबळे यांनी उषा कांबळे यांचे अभिनंदन करण्यासाठी सत्कार करून, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सत्कार समारंभ नंतर सत्काराला उत्तर देताना उषा कांबळे यांनी सांगितले की, उदगीरच्या जनतेने आजपर्यंत आपल्यावर खूप प्रेम केले आहे. त्या प्रेमाचे उत्तराई होऊन, काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. तसेच पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीला आपण सक्षमपणे काम करून सार्थ ठरवू. असा विश्वास व्यक्त केला. तसेच अनेक मित्र, मैत्रिणीनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले.
