अहमदपूर आगाराची एक ही बस वाढवणा गावात येत नसल्याने शासनाने दिलेल्या सवलती पासून ग्रामस्थात वंचित
वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु येथे गावात व परिसरातील ग्रामस्थांना गरीबाची जिवन संगिनी बस मध्ये दिलेल्या अनेक सवलतीचा लाभ गावातून थेट अहमदपूर आगाराची बस पाठवत नसल्यामुळे सतरा हजार प्रवाशी युती सरकारने दिलेल्या तिकीट दरातील सवलती पासुन वंचीत असल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी पसरली आहे.सवलत असुन देखील बस नसल्याने गोरगरीब प्रवाशांना खाजगी वहानाने जादा भाडे देऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
शिंदे सरकारने बस प्रवासात अनेक सवलती दिल्यात, मात्र अहमदपूर आगारातील बस वाढवणा गावात येत नसल्याने सवलतिचा लाभ मिळण्यापासून वाढवणा व वाढवणा परिसरातील अनेक गावातील जेष्ठ, दिव्यांग, महिलांना बस मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सवलत तसेच अमृत महोत्सव निमित्त 75 वरील महिला, पुरुषांना मोफत प्रवास आहे. मात्र अहमदपूर आगारातील बस वाढवणा गावात पाठवत नसल्याने स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तसेच अहमदपूर आगार फक्त वाढवणा गावापासून 30 किलोमीटर अंतरावर असुन कमीत कमी वाढवणा व आजूबाजू परिसरातील अनेक गावाची लोकसंख्या मिळून 15 ते 17 हजार लोकसंख्या होते, तरी पण अहमदपुर आगार प्रमुख आगार झाल्यापासून उदगीर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात अहमदपूर बस पाठवत नसल्यामुळे प्रवाश्यात नाराजी पसरली आहे. शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ मिळत नाही, या बाबीकडे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालुन वाढवणा बु. व परिसरातील ग्रामस्थांना महामंडळाच्या बसच्या पुर्ण सवलती प्रवाशांना मिळण्यासाठी थेट वाढवणा गावातून प्रवाशांना सुकनी, हाळी, हंडरगुळी, शिरूर ताजबंद, अहमदपूर जाण्यासाठी व पुढे लोहा, नांदेड,परभणी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट अहमदपूर आगाराची बस वाढवणा- अहमदपूर सुरु केल्यास प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येईल.
तसेच वाढवणा अहमदपूर बस चालु झाल्यास वाढवणा व परिसरातील लोक बाजार करून उपजीविका भागीवणाऱ्या असंख्य महिला, पुरुष, भाजीपाला विक्री करण्यास दररोज बाजाराला जातात. अशा लोकांना सवलतीचा फायदा मिळणार आहे. रविवार हाळी हंडरगुळीचा बाजार, सोमवार अहमदपूर बाजार, मंगळवार हाडोळती, बुधवार किनगाव, गुरुवार शिरूर ताजबंद शुक्रवार चाकूर, शनिवार गंगाखेड बाजार असल्यामुळे वाढवणा व परिसरातील अनेक व्यापारी, शेतकरी, भाजीपाला विक्री करणारे प्रवाशी उदरनिर्वाहासाठी सतत दररोज नवीन आठवडी बाजाराला जाऊन व्यापार करून उपजीविका चालवतात. अशा प्रवाशांना थेट बस ने प्रवास केल्यास पैशाची व वेळेची बचत होईल. खऱ्या गरजूलोकांना शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी अहमदपूर आगार प्रमुखांनी जातीने लक्ष घालून वाढवणा -अहमदपूर बस चालु केल्यास सर्व ग्रामीण भागातील प्रवाशांना सवलत तर मिळेलच, वाढवणा बु, केसगरवाडी,बेळसांगवी,लाळी,येवरी, डांगेवाडी, डाऊळ, खेर्डा, हिप्परगा, वाढवणा खुर्द,किणी, वाढवणा पाटी, सुकनी, हाळी हंडरगुळी, वायगाव पाटी, शिरूर ताजबंद या गावातील प्रवाशांना ही बस फार उपयोगी होईल. बसला देखील भरपूर अर्निंग मिळेल. तरी अहमदपूर आगार प्रमुखाने जातीने लक्ष घालुन वरील गावातील ग्रामस्थांना शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ सर्व ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, भाजी पाला विक्री करून उपजीविका भागविणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे.
