राम नवमीनिमित्त अहमदपूर शहरात भव्य शोभा यात्रा

राम नवमीनिमित्त अहमदपूर शहरात भव्य शोभा यात्रा

अहमदपूर शहरात श्रीराम प्रभूच्या रामनामाचा जयघोष

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरात राम नवमीनिमित्त दि. ३१ रोजी राम जन्मोत्सव संयोजन समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढली. विविध देखावे, भगव्या पताका, विद्युत रोषणाई आणि डिजेच्या वाद्यात तरुणाईने आनंदोत्सवात जन्मोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हजारो तरुणांनी विद्युत रोषणाईत, डीजेच्या निनादात नृत्य करत श्रीराम प्रभूच्या रामनामाचा जयघोष केला.

राम नवमिनिमित्त शहरात काठलेली शोभायात्रा ही क्रांती चौकातून आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, थोडगा रोड राम मंदिर पर्यंत काढण्यात आली. यात श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भारत माता, महर्षी वाल्मिकी यांचे देखावे, वेशभूषा सादर करण्यात आले. सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत ही शोभायात्रा चालली. शोभायात्रा मिरवणुकीच्या रोडवर सर्वत्र भगव्या पताका लावल्याने भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. भगव्या पताका, विद्युत रोषणाई, जागोजागी चौका चौकात श्रीराम प्रभूचे मोठ-मोठे पोस्टर्स, कटआउटने नागरिकांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची कार्य, माहिती एका मोठ्या स्क्रीनद्वारे दाखवून सखल राम भक्तांना दर्शन घडविले. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी या शोभायात्रेस उपस्थिती दर्शवून श्रीराम प्रभूची दर्शन घेतले. तर शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्यावतीने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दुपारच्या टिफीनची व्यवस्था करुन राम भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली. या भव्य शोभायात्रेत हजारो तरुणाई श्रीरामाच्या, बजरंगबली हनुमानाच्या गाण्यावर, डीजेच्या संगीतात ठेका देऊन नाचत होती. चौका चौकातील रोषणाई सबंध रोडवर लावलेल्या भगव्या पताका यांनी प्रेक्षकांची लक्ष वेधून घेतले. आणि गाण्याच्या तालावर ठेका घेऊन नाचत असलेली तरुणाई सोबत प्रेक्षकही हळुवारपणे जागच्या जागी ठेका धरत असल्याचे पहावयास मिळाले. यावेळी जिकडे पहावे तिकडे श्रीरामाचा जयघोष ऐकवयास मिळत होता. कसलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत रामनामाच्या जयघोषात शोभायात्रा पार पडली. सबंध शोभायात्रेत, अहमदपूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उप-अधिक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

error: Content is protected !!