गवी वाडी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर, ग्रामपंचायतीने केले फटाके फोडून आमदारांचे अभिनंदन

गवी वाडी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर, ग्रामपंचायतीने केले फटाके फोडून आमदारांचे अभिनंदन

किल्लारी (प्रशांत नेटके) : सांगवी पासून अवघ्या दोन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजे सांगवी वाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने नागरीकांना अनेक अडचणींला तोंड द्यावे लागत होते.सांगवीवाडी ही सांगवी ग्रामपंचायतीचा वार्ड क्रं.तिन असून अनेकदा शासनस्तरावर ग्रामपंचायतीने प्रयत्न केला परंतु रस्ता झाला नाही.रस्ता नसल्याने मागील दहा वर्षात सहा नागरीकांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागले.पावसाळ्याच्या दिवसात गाव सोडणे ही कठीण होतं दोन तिन कि.मी.अंतर चिखल तुडवत वृद्ध,महिला,मुले तर गावी ये जा करणे हे जिकीरिचे होते. शासनस्तरावर प्रयत्न करुनही गेल्या दहा विस वर्षांत थोडीफार डागडूजी झाली होती.औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगवी वाडी येथे गतवर्षी लोकांच्या भेटी घेतल्या त्यांचे मत ऐकले व जोपर्यंत वाढीचा रस्ता होणार नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे म्हणत आता यापुढे वाडीला येईन तर नवीन रस्त्यावरुनच येईन असा शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण करुन जवळपास एक कोटीचा निधी मंजूर करुन दिला आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून रस्ता निधी मंजूर झाल्याने सांगवी वाडी व सांगवी येथील नागरीकांनी फटाके फोडून व साखर वाटून आनंद व्यक्त केला यामध्ये सरपंच धनराज सुर्वे, उपसरपंच राम सरतापे, सतिश सरतापे ,राजू गायकवाड, राजपाल सरतापे,एम.डी.सरतापे, रमेश शिंदे,शहाजी माडबोने,मदन लोटले, वाल्मिकी कोळी वाडीचे काशीनाथ दांडगे,खंडू दांडगे,ज्ञानोबा बिराजदार, गोपाळ लामतुरे,बालाजी दाडगे यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

About The Author

error: Content is protected !!