उपविभागातील शेतकरी यांच्यासाठी महाराजस्व अभियान सुरू – प्रवीण मेंगशेट्टी

उपविभागातील शेतकरी यांच्यासाठी महाराजस्व अभियान सुरू - प्रवीण मेंगशेट्टी

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर उपविभागातील शेतकऱ्यांसाठी महाराजस्व अभियान ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या निर्देशानुसार उदगीर तालुक्यातील हेर मंडळ विभागात महाराजस्व अभियानाची सुरुवात उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. हेर मंडळ विभागाअंतर्गत येणाऱ्या हेर, वायगाव, करडखेल, दिग्रस, सताळा, लोहारा, कुमठा, क्षेत्रफळ या गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तंटामुक्ती ग्राम योजनेचे अध्यक्ष, पोलीस पाटील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, युवक व शेतकरी यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्याला उद्देशून बोलताना उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी आवाहन केले की, आपण लोकसहभागातून गावातील रस्ते बनवावेत,सलोखा टिकून राहावा म्हणून शेत रस्ते, पाणंद रस्ते, वहिवाट रस्ते सामुपचराने सोडऊन मोकळे करून घ्यावेत. त्यानंतर त्या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन मे पर्यंत आदेश काढल्यानंतर या संधीचा फायदा घेऊन उत्पन्न वाढवावे, आणि अडचणी सोडवाव्यात. असे आवाहन केले. कोणीही तक्रार न करता गावातील शिवार रस्ते खुले करावेत, असेही सांगितले. याप्रसंगी हेरचे उपसरपंच तुळशीराम बेंबळे यांनी उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार केला. तसेच या कार्यक्रमात तत्कालीन तलाठी व सध्याचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी हेर गावात 45 रस्ते खुले केले आहेत. त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच तुळशीराम बेंबडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, माजी उपसभापती सोपानराव ढगे, माजी सरपंच माधवराव मिटकरी, अविनाश सूर्यवंशी, माजी सरपंच गोविंद कोंबले, माजी सरपंच शिवलिंग जळकोट, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य प्रकाश मिटकरी, श्याम गुरमे, पोलीस पाटील यशवंत पाटील, एकनाथ कसबे, दत्ता माटेकर, राज तवांडे, गंगाधर मिटकरी, विश्वनाथ कोरे, धनाजी माटेकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक तानाजी जाधव, पांडुरंग ढगे यांच्यासह अनेक मान्यवर शेतकरी, तसेच तलाठी सावन उळागड्डे, राजकुमार हलकुडे, संतोष पाटील, अनुराधा अलगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक पंडित जाधव यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!