शासकीय धान्य गोदाम देवणी येथून रास्त भाव दुकानदारास आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : राज्य शासनाच्या वतीने गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाच्या शिधा वाटपास शासकीय धान्य गोदाम देवणी येथून गोदाम व्यवस्थापक दृष्टांत कांबळे यांच्या हस्ते देवणी तालुक्यातील चेअरमन अजय मल्हारी शिंदे, आर पी गौंडगावे, सौदागर शेळके यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले,यावेळी पत्रकार शकील मनियार,प्रकाश कोचेवाड,बालाजी स्वामी, भरत पतंगे, आदि उपस्थित होते,देवणी तालुक्यातील एकूण , १९५४४लाभार्थ्यांना १०० रुपये मध्ये कमी दरात याचा लाभ मिळणार आहे. या आनंदाचा शिधा पॅक मध्ये एक किलो रवा,एक किलो साखर,एक किलो चणाडाळ, व एक पाम तेल पाकीट मिळणार असल्याचे गोदाम व्यवस्थापक दृष्टांत कांबळे यांनी सांगितले.
