वाढवणा बु येथे गाव नकाशावरील शेत रस्ते मुक्त अभियान बैठक संपन्न

वाढवणा बु येथे गाव नकाशावरील शेत रस्ते मुक्त अभियान बैठक संपन्न

वाढवणा बु (एल.पी.उगीले) : वाढवणा बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात वाढवणा मंडळ विभागांतर्गत येणाऱ्या सर्व वाढवणा बु, वाढवणा खुर्द, हाळी, हंडरगुळी, मोरतळवाडी, सुकनी, अडोळवाडी, चिमाचीवाडी, किनियल्लादेवी, उमरगा मन्ना, अनुपवाडी, रुद्रवाडी,वंजारवाडी,गावातील शेतकरी यांची सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय वाढवणा बु .येथे बैठक संपन्न झाली. गाव नकाशा वरील शेतरस्ते मुक्त अभियान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या संकल्पनेतून उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वरजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढवणा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व गावचे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे बाबत बैठक संपन्न झाली. या वेळी मंडळ अधिकारी गणेश हिवरे यांनी शेतकऱ्यांना शेत रस्त्याबाबत माहिती व महत्त्व पटवून सांगितले. सर्व गावातील क्षेत्र रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत आवाहन या बैठकीत करण्यात आले, तसेच गाव नकाशावर आसलेली सर्व गावातील शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करणारच, या साठी शेतकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत प्रशासनाला सहकार्य करावे, तारीख देण्यात येईल त्या दिवशी आम्ही सर्व समोर राहून अतिक्रमण मुक्त रस्ते करूनच जाऊ. कोणी शेतकरी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास कलम 353प्रमाणे शासकीय कामात अडथळा म्हणुन कार्यवाही करण्यात येईल, नकाशा वर असलेले रस्ते हे शेतकऱ्याची नसतात, ते सार्वजनिक असतात. अशी सविस्तर माहिती देखील देण्यात आली. या प्रसंगी वाढवणा महसूल मंडळ विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकरी, सरपंच, पोलीस पाटील व पत्रकार बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!