औंकारेश्वराच्या आशिर्वादाने जिल्हापरिषदेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करु शकलो – राहूल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) मतदारांच्या आशीर्वादामुळे जि.परिषदेचा अध्यक्ष होऊ शकलो, असे मत राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
ओंकारेश्वर महादेव मंदिर एस.टी.काॅलनी मलकापूर येथे आयोजित परमरहस्य ग्रंथ पारायण ,प्रवचन सोहळा चालू असुन मंदिराचे सभागृह जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी दिलेल्या जि.प.च्या दहा लाख रुपयाच्या निधीतून बांधण्यात आले आहे.राहूल केंद्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली .मंदिर सभागृहासाठी दहा लाख रुपये निधीतून सभागृह बांधून दिल्याबद्दल औंकारेश्वर महादेव मंदिरच्या वतीने अशोक कप्ते व सौ.वनमाला कप्ते यांच्या हस्ते राहुल केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित महिला भक्ता समोर बोलताना राहूल केंद्रे म्हणाले की, मलकापूरवासियांनी मतदानरुपी आशीर्वाद दिल्यामुळेच जि.प.सदस्य व महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकलो. त्यामुळे नाविण्य पुर्ण उपक्रम जिल्हापरिषदेच्या माध्यमातून राबवू शकलो . लातूर जिल्हा परिषदेला मानाचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला. या बरोबर अनेक पुरस्कार मिळाले, ते सर्व मतदारांना समर्पित करतो असे म्हणाले .
शिव संप्रदाय हरिभजनाच्या माध्यमातून समाजित एकोपा निर्माण होतो, तो सातत्याने चालू राहिला पाहिजे.लहान व युवा पिढी मोबाईलच्या ज्यास्त आहारी गेली आहे. त्यापासून परावृत करण्याची जबाबदारी मातांची आहे.चांगले संस्कार आपल्या पाल्यावर करा, ज्या वयात मुलावर आई वडिलांचे प्रेम मिळणे अपेक्षित असताना अपेक्षांचे ओझे मुलांवर लादून शिक्षणासाठी दुर ठेवले जाते, यामुळे आई वडिलाबरोबरचा संवाद तुटतो. याचा परिणाम वृधापकाळात ज्यांचा आधार हवा तेच वृध्दाश्रमात पाठवतात, ही वेळ येऊ देऊ नका. मुलावर संप्रदायाचे संस्कार पडू द्या . महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत, शिक्षण म्हणजे फक्त शिक्षक, ईंजिनअर, डाॅक्टर यापुरते मर्यादित न ठेवता स्पर्धात्मक परीक्षेस सामोरे जावे, असे आवाहन केले.राज्यात व केंद्रात आपल्या विचाराचे सरकार असल्यामुळे ओंकारेश्वर मंदिरचे उर्वरीत राहिलेले काम यापुढिल काळात पुर्ण करण्याचा शब्द दिला.यावेळी ओंकारेश्वर महिला भजनी मंडळ, आजोबा गणपती महीला भजनी मंडळ ,शिवनगर ,शिवशक्ती महिला भजनी मंडळ या सह एस.टी.काॅलनी व परिसरातील महिला भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रास्ताविक राम मोतीपवळे यांनी तर संचलन सरस्वती हलबूर्गे व आभार सुनिता कड्डे यांनी मानले.
