शिवापेक्षाही गुरू सर्वश्रेष्ठ- शि.भ.प.कु.ज्योती टाकळे

शिवापेक्षाही गुरू सर्वश्रेष्ठ- शि.भ.प.कु.ज्योती टाकळे

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय संस्कृतीत गुरुला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. गुरुमुळे माणसाला मार्ग सापडतो, प्रेरणा मिळते. शिवाकडे जाण्याचा रस्ताच गुरुमुळे मिळू शकतो. त्यामुळे शिवापेक्षाही गुरु सर्वश्रेष्ठ आहे. असे विचार शि.भ.प.कु.ज्योती टाकळे यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर नवीन वसाहत पोस्ते नगर एस.टी.काॅलनी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात आयोजित परमरहस्य ग्रंथ पारायण ,प्रवचन सोहळ्यात शि.भ.प.कु.ज्योती टाकळे बोलत होत्या. यावेळी गुरुची महिमा सांगताना त्या म्हणाल्या की, गुरु म्हणजे गुणाच्या रुपाच्या पलिकडे असलेल्या निर्गुण निराकार परमात्म्याचे जो ज्ञान देतो, तो गुरु होय. शिव हे एक परब्रम्ह तत्व आहे. ते कधी भेटत नाही, बोलत नाहीत, परंतु गुरु आपणाला भेटतात, बोलतात. शंकाचे समाधान करतात. गुरु हे मानवी जीवाला आकार देतात. सन्मार्ग दाखवतात .गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरु अज्ञान दूर करतात. गुरु आपल्याला जगण्याचा उद्देश सांगतात. ज्ञानाची ज्योत पाजळून शिष्याला सन्मार्ग दाखवतात. गुरु सारखा दाता त्रिभुनात नाही. देव फक्त भक्ताला देतो. परंतु गुरुपाशी भेदभाव राहत नाही, गुरु हे सर्वांनाच निरपेक्षपणे ज्ञान देत असतात.गुरु हाच देव आहे. गुरु हे तत्व आहे. ज्यांचे आदीही नाही आणि अंतही नाही, म्हणून गुरु सर्वश्रेष्ठ आहे .
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जवळ ज्ञान होते, तेवढेच विज्ञानही होते. महाराजांनी शिष्याला श्रद्धा ठेवायला सांगितले, परंतु अंधश्रद्धा ठेवायला सांगितले नाहीत, असे बहुमोल विचार कु.ज्योती टाकळे यांनी सांगीतले.यावेळी परिसरातील भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.जनाबाई भोसले यांनी तर शितल कप्ते यांनी आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!