गणेश मुंडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारने सन्मानित

गणेश मुंडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील डोंगराळ व ग्रामीण भागातून पत्रकारीतेच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासुन अनेक सामाजिक विषयाला धरून बातमीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करणारी कामे करत आहेत.त्याच बरोबर समाजातील गोर गरीब जनतेचे ते काम तर करत असतात. समाजातील नागरीकांना जमेल त्या पध्दतीने मदत करत असतात.त्यांनी विविध पदावर काम केले आहे, करत आहे. शालेय समिती अध्यक्ष,पर्यटन व सांस्कृतिक समीती जिल्हा सचिव,आरोग्य कल्याण समीती सदस्य प्रा.आरोग्य केंद्र वाढवणा.व्हाइस ऑफ मिडीया अध्यक्ष उदगीर,या कार्याची दखल घेत बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघा मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार महात्मा जोतीबा फुले भवन पुणे येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. बहुभाषिक भाऊ – बाबा वंजारी समाज संघटना पुरस्कार बरोबर समाजातील अन्य प्रश्नावर आवाज उठवीन्या बाबतचे कार्य करते. समाजातील काम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देतात. राज्यस्तरीय वंजारी संघाच्या मेळाव्यात गणेश मुंडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवाडी पुणे येथे वितरित झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान सानप हे होते, तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ऑड.प्रताप काका बबनराव ढाकणे,बाळासाहेब सानप, सौ.सुशिलाताई मोराळे बिड, लक्ष्मण भाऊ मुंडे परभणी,हे होते. तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत असलेले सौ हर्षदा शिवाजीराव काकडे, पुष्पाताई कुतरवाडे, बबनराव जायभाये पुणे, सुनिता ताई दौंड, नंदू सानप नाशिक या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे निमंत्रक सौ. लक्ष्मीताई गरकळ मुंबई, महासचिव श्रीमंत केदार, विष्णुदास चेमटे पुणे हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नंदू सानप यांनी केले तर आभार लक्ष्मीताई गरकळ यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!