भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा संपन्न

भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून उदगीर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही यात्रा काढण्यात आली.भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव, गोविंदराव केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या गौरव यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
ही गौरव यात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून निघत छत्रपती शाहू महाराज चौकात पोहंचली,तेथे या यात्रेची सांगता करण्यात आली. या गौरव यात्रेत भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो व वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना माजी आ. गोविंद केंद्रे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातो आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमान करण्याआधी स्वातंत्र्यवीरांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, तेथे एक रात्र काढून बघावी, मग बोलावे. असा सल्ला देत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, ही गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या गौरव यात्रेत माजी आ. धर्माजी सोनकवडे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, अमोल निडवदे, धर्मपाल नादरगे, नंदकुमार नलंदवार, मनोहर भंडे, सतीश उस्तुरे, ऍड. दत्ता पाटील, बसवराज पाटील कोळखेडकर, साईनाथ चिमेगावे, अरुणा चिमेगावे, उत्तरा कलबुर्गे, सरोजा वारकरे, प्रा. पंडित सूर्यवंशी, ऍड. सावन पस्तापुरे, मंदाकिनी जीवने, वर्षाराणी धावारे, आनंद बुंदे, व्यंकट काकरे, बालाजी गवारे, राजकुमार देशमुख, आनंद साबणे, सुनील सावळे, सुधाकर बिरादार, अमर सूर्यवंशी, नवज्योत शिंदे, पप्पू गायकवाड, संगम अष्टुरे, भारती सूर्यवंशी, शहाजी पाटील, वसंत शिरसे, हनुमंत रेड्डी, स्वाती वट्टमवार, शिवाजी भोळे, जया काबरा, अमोल अनकल्ले, कृपा सूर्यवंशी, मधूमती कनशेट्टे, लक्ष्मण जाधव, शंकर रोडगे, प्रदीप जाधव, राजू पाटील, राम जाधव, सुदर्शन माने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!