अहमदपूर बाजार समितीच्या निवडणुकीत शंभर उमेदवार रिंगणात

अहमदपूर बाजार समितीच्या निवडणुकीत शंभर उमेदवार रिंगणात

काँग्रेसची भाजपा व राष्ट्रवादी दोन्ही पक्षासोबत उमेदवारी दाखल.

नामनिर्देशन पत्राची विक्री १४४ तर १०० दाखल.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी मानली जाते. ही निवडणूक नगरपालिका,पंचायत समिती ,जिल्हा परिषद ची तालीम असुन हि निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेची केलेले दिसून येते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,भारतीय जनता पक्ष, भारतीय काँग्रेस पक्ष ,शिवसेना आदी पक्षाच्या उमेदवारांनी एकूण शंभर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर १४४ नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांनी सांगितले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंचकराव मोहनराव जाधव, माधव रावसाहेब पवार ,सुंदर गोविंदराव साखरे, सतीश प्रतापराव नवटक्के, शिवाजी खांडेकर ,अनिल मेनकुदळे, दिलीप जाधव ,संजय पवार ,चंद्रकांत गंगथडे, शिवाजी सुभाषराव पाटील, रामदास गोविंद कदम ,संतोष रोडगे ,चंद्रशेखर विनायक जाधव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस ,भारतीय काँग्रेस व ठाकरे गटाकडून एकूण 35 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
तर भाजपा काँग्रेस व शिवसेना या पक्षाकडून जीवन कुमार रामराव मद्देवाड, प्रवीण मनोहर आरदवाड, व्यंकट बालासाहेब पाटील ,निळकंठ बापूराव होनराव, शेषराव आश्रुबा राठोड, राघवेंद्र दिगांबर शेळके, ज्ञानोबा रामराव बडगिरे ,प्रशांत सुधाकर शिंदे, संजय लक्ष्मण मिरजगावे ,अक्षय आबासाहेब देशमुख ,धनराज भगवानराव पाटील, विलास दयासागर शेटे ,सौ मोहिनी कदम, पंडित गुट्टे , महेश राजपाल सूर्यवंशी ,भास्कर कदम ,दत्ता सुरनर ,वसंत मुंडे ,तुकाराम देवकते अदिसह एकूण ४४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले आहेत.
सहकारी संस्थेच्या ११ जागेसाठी- यामध्ये सर्वसाधारण च्या आठ जागेसाठी ३८ पुरुष उमेदवारांनी ,महिलांच्या दोन जागेसाठी आठ महिला उमेदवारांनी, ओबीसी च्या एका जागेसाठी पाच उमेदवारांनी आणि व्ही.जे.एन.टी यां एका जागेसाठी सहा उमेदवार असे एकूण 57 उमेदवारांनी सहकारी संस्थेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी यातील सर्वसाधारण दोन जागांसाठी १५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहेत तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल एका जागेसाठी आठ उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी सहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत असे चार जागेसाठी २९ उमेदवार उभे आहेत. तसेच व्यापारी मतदारसंघातील दोन जागेसाठी नऊ उमेदवार आणि हमाल मापाडी एका जागेसाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे एकूण शंभर उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत.

About The Author

error: Content is protected !!