डॉ.वैभवी तत्तापूरे हिचे एम बी बी एस परीक्षेत नेत्रदिपक यश

डॉ.वैभवी तत्तापूरे हिचे एम बी बी एस परीक्षेत नेत्रदिपक यश

अहमदपूर ( गोविंद काळे) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून यशवंत विद्यालयाचे सहशिक्षक राम तत्तापुरे आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे -तत्ता पुरे यांची कन्या डॉ. वैभवी रामलिंग तत्तापुरे ही एम बी बी एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे.
तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश दादा हाके- पाटील ,सचिव तथा प्राचार्या रेखाताई हाके -पाटील भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य व्ही व्ही गंपले, शिवकुमार सोनटक्के, गुंडप्पा तत्तापुरे यांच्यासह मित्र परिवारांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!