अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय बनले शहाजी महाराज ‘मिया वाकी’ आणि राजमाता जिजाऊ ‘गार्डन’चे जंगल…!
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालया अहमदपूर शहरातील पर्यावरण पूरक उपक्रम राबवून लातूर जिल्ह्यातील पहिले मियावाकी अर्थात आनंद घनवन प्रकल्प शहाजीराजे भोसले यांच्या नावे सुरू करण्यात आला. तत्पूर्वी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ उद्यान निर्माण करून बालाघाटाच्या पायथ्याशी पर्यावरण पूरक जंगल निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून केले.
महात्मा फुले महाविद्यालय हे अहमदपूर शहराचे नंदनवन बनले असून, महाविद्यालय परिसरात शहाजीराजे भोसले यांच्या नावाने मियावाकी प्रकल्प, राजमाता जिजाऊ यांच्या नावे उद्यान तयार करण्यात आले असून यामध्ये औषधी वनस्पती सह विविध फळांची झाडे, घनदाट सावली देणारी झाडे, तसेच चोवीस तास प्राणवायू अर्थात ऑक्सिजन देणारी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून, याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह अहमदपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहे.
हे दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न करून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून पर्यावरण पूरक प्रकल्प राबविले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक विद्यापीठ, जिल्हा प्रशासन, तहसील स्तरावरील विविध मान्यवरांनी तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी कौतुक केले आहे.
या प्रकल्पास आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.वसंत भोसले, प्राचार्य डॉ . दीपक बच्चेवार ,डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. संतराम मुंढे , सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, डॉ. डी एन मोरे, डॉ.एन.टी. कांबळे , डॉ. विनोद माने यांच्यासह नांदेड विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे माजी सहसंचालक डॉ.विठ्ठल मोरे, सहसंचालक डॉ. रामकृष्ण धायगुडे यांच्यासह अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आदींनी भेट देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
या कार्याची दखल घेऊन नगरपरिषद अहमदपूर व नगरपरिषद लोहा यांनी पर्यावरण पूरक कार्य केल्याबद्दलचे प्रशस्तीपत्र प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना सन्मानपूर्वक बहाल केले. पर्यावरण पूरक कार्य केल्याबद्दल विद्यापीठस्तरावर महात्मा फुले महाविद्यालयाचे महाविद्यालयाचा गुणवत्तेबरोबरच लौकिक वाढत आहे.
