शिरूर ताजबंद येथे श्री क्षेत्र महादेवाच्या यात्रेची उत्साहात सुरुवात

शिरूर ताजबंद येथे श्री क्षेत्र महादेवाच्या यात्रेची उत्साहात सुरुवात

हाजारो भाविकांच्या उपस्थितीत शिव – पार्वती विवाह सोहळा संपन्न

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद पूरातन नाव ( शिव – ऊर ) शिव म्हणजे महादेव – ऊर म्हणजे कानडी भाषे मध्ये गांव म्हणतात .या तिर्थ क्षेत्राची या वर्षी यात्रा उत्साहात भरली आहे .कोरोनाच्या महामारी मुळे शेकडो वर्षात दोन वर्ष यात्रा झाली नाही . यामुळे महादेव भक्त गणाची निराशा झाली होती . या वर्षी मंदिरात पूजा – आरती – अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात होतो. जाज-वल्य व स्वंमभू शंकराची महिमा आहे.लाखो भावीकांचे श्रद्धास्थान ‘दक्षिण काशी ‘ म्हणुन ओळखणार्या श्री श्रेत्र महादेव मंदिर शिरूर ताजबद येथे आहे . चैत्र महिणा फार महत्वाचा एका दशिला ला महादेवाची यात्रा भरत असते . हनुमान जयंती ला यात्रेची सांगता होते . गावात बारा दिवस ‘काठी -कावडी ‘ बसतात . बारशी ला ‘शिव – पार्वती विवाह सोहळा’ (महादेवाचे लग्न ) सपन्न झाले . मानकरी व मंदिर कमिटी चे कार्यकारी मंडळ भजनी मंडळ सह हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.भंडारा दिवशी दि.4 एप्रिल मंगळवारी रोजी महाप्रसाद .ग्रामस्थ व भाविक भक्त पाडव्या पासून महादेवा चा बारा दिवसाचा उपवास करतात. या वर्षीअखंड हरिनाम सप्ताह किर्तन भजन मोठ्या प्रमाणात होत आहेत . सन १९५४ सालापासून मंदिरात सप्ताह चालू आहे. हरिनाम सप्ताहाची सुरुवात तिथी नुसार षष्ठीला होत असते . त्रयोदसिला भंडारा होवून गाव व परिसरातील हजारो भाविका साठी महाप्रसाद होत असतो नैवेध झाल्यावर महाप्रसाद म्हणुन गव्हाची खिर, भात व हुलपली वाटप . मागील काळात होणारे कुस्ती, पशु प्रदर्शन यावर्षी ही नाही,पाळणे खेळणे ,प्रसादाचे स्टॉल ,यात्रेत आले आहेत मंदिर व्यवस्थापन कमीटीचे अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मंदिरात त भाविकांची व्यवस्था चालू आहे . महादेव मंदिर व शिव – पार्वती मंगल कार्याल चे बांधकाम प्रगती पथावर आहे. मंदिराच्या कामात व्यवस्थापन कमिटी व कर्मचारी नेहमी परिश्रम घेत असतात. दोन वर्ष कोरोना च्या महामारी मुळे एकदरीत सर्वत्र शासणाची नियमावली असल्याने भाविकाचा – ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता . महादेवा ला एकच साकडे घालून महामारी नष्ट व्हावी अशी प्रार्थना ग्रामस्थ -भावीक करीत होते . 28 मार्च पासून श्री श्रेत्र महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह चालू होता दि .3 रोजी सांगता झाली . दररोज पहाटे काकडा, सकाळी 7 ते 9 शिवलिलामृत पारायण 12 ते 1 गाथा भजन 1 ते 3 महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व या सप्ताहात अंबेगाव, शिरूर, धाकटीवाडी, भवानवाडी ,थोरली वाडी महादेववाडी येथील भजनी मंडळ सहभागी . महाप्रसाद दि .4 रोजी चैत्र शु . मंगळवारी . मंदिराचे फार मोठे काम चालू आहे .मंदिर जिर्णोध्दार करीता सढळ हाताने भाविकांनी देणगी द्यावे असे मंदिर कमिटिने चे अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील व कार्यकारी मंडळ तसेच मंदिर व्यवस्थापक शिवाजी स्वामी यांनी अवाहन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!