संस्काराच्या बीजारोपणात मातृशक्तीचा सिंहाचा वाटा -ष.ब्र.डॉ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज

संस्काराच्या बीजारोपणात मातृशक्तीचा सिंहाचा वाटा -ष.ब्र.डॉ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज

उदगीर (एल.पी.उगीले) : मातृशक्ती ही श्रेष्ठ शक्ती असून या शक्तीच्या उपयोगातून संस्काराचे बिजारोपन प्रत्येक घरात व्हावे, असे विचार ष.ब्र.डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशिर्वचनात व्यक्त केले.उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर नवीन वसाहत पोस्ते नगर, एस.टी.काॅलनी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात आयोजित परमरहस्य ग्रंथ पारायण ,प्रवचनाची सांगता सोहळा श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ संस्थानचे मठाधिश ष.ब्र.१०८डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे उपस्थितीत संपन्न झाला.प्रारंभी राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक झिरो पाॅंईट उड्डाणपुल येथून डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची कलशधारी महिला व परमरस्य ग्रंथाची मिरवणूक निघून औंकारेश्वर महादेव मंदिर येथे मिरवणूकीचा समारोप झाला.
डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थित आयोजित सांगता सोहळ्यास माजी गृहराज्य मंत्री आ.संजय बनसोडे ,बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील, प्रा,डाॅ.मल्लेश झुंगा स्वामी,ग्रा.प.सदस्य सौ.सोनाबाई बळवंतराव पाटिल,ग्रा.प.सदस्य महेश तोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी औंकारेश्वर महादेव मंदिरच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. आपल्या आशिर्वचनात डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, सुसंस्कारीत पिढी निर्माण होईल असे संस्कार होणे गरजेचे आहे, असे विचार व्यक्त करुन म्हणाले की,कोणतेही काम एकट्याने होत नाही. यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. सर्वांच्या सहभागाने पुर्णत्वास जाते.श्री गूरुहावगी स्वामी मठाचे जिर्णोध्दाराचे काम अंतिम ठप्यात आले असून या कार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.प्रा.डाॅ.मल्लेश झुंगा स्वामी म्हणाले की,आनंद हा बाजारात विकत मिळत नाही त्यासाठी सतसंगामध्ये यावे लागेल. ईश्वराचे नामस्मरण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी निर्भेळ आनंद प्राप्त होतो.संसारात व्यस्त असलेल्या लोकांना समाधान शांती लाभते, त्यातूनच आनंदाची निर्मिती होते. यातून एक वेगळ्या उर्जेची अनुभूती होते. म्हणून खऱ्या आनंद प्राप्तीसाठी सतसंगात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
शेवटी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी आयोजित महाप्रसादाचा भाविक भक्तानी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कप्ते यांनी केले.
सूत्रसंचालन राम मोतीपवळे यांनी तर अभार सौ.शितल कप्ते यांनी मानले .
सोहळा यशस्वी करण्यासाठी औंकारेश्वर महादेव भजनी मंडळाचे सौ वनमाला अशोक कप्ते,सौ.सरस्वती हलबर्गे, सौ.आराधना बदलानी,श्रीमती जयदेवी पोस्ते, श्रीमती सुनिता कड्डे, सौ.पार्वती स्वामी यांच्या सह औंकारेश्वर महादेव भजनी मंडळाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!