माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांगाना साहित्य वाटप कार्यक्रम भागीरथी मंगल कार्यालय आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी बच्चूभाऊ कडू आले होते, यांच्या हास्ते 50 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमानंतर प्रहारचे उपजिल्हा प्रमुख, बच्चूभाऊ कडू यांचे कट्टर समर्थक विनोद तेलंगे यांच्या निवासस्थानी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सदिच्छाभेट दिली. या प्रसंगी तेलंगे व मित्र परिवाराच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद तेलंगे, भगवान तेलंगे, अमोल तेलंगे, सुरेखा तेलंगे, वैशाली तेलंगे, नम्रता तेलंगे, मीना कोल्हारे, बालाजी भालेराव, सारीका भालेराव, पवन तेलंगे, आकाश भालेराव, शंकर कुलकर्णी, भरत चामले, रविकिरण बेलकुंदे, आशीष भालेराव, तूलसीदास तेलंगे, मगदुम शेख, बालाजी जाधव यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
