आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात निघालेल्या सावरकर गौरव यात्रेने रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेतले
लातूर (एल.पी.उगीले) : स्वातंत्र्य आणि सुराज्य स्थापनेसाठी अथक परिश्रम घेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गौरवयात्रा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर येथे गुरूवारी सायंकाळी मोठया उत्साहाच्या आणि देशभक्तीमय वातावरणात काढण्यात आली. वाजत, गाजत प्रचंड प्रतिसादात निघालेल्या या गौरव योत्रेने रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणिय होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमान केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघातून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. समाजसुधारक, राष्ट्रभक्त, हिंदू संघटक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी रेणापूर येथे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही गौरव यात्रा, चांदणी चौक, बसवेश्वर चौक, एकुर्गे गल्ली, पोस्ट ऑफीस, यलम गल्ली मार्गे रेणापूरचे ग्रामदैवत आदीशक्ती श्री रेणूकादेवी मंदिराच्या समोरील प्रांगणात पोंहचली,तिथे या यात्रेचा समारोप झाला. समारोपपूर्वी रेणुका मातेची आ. रमेशआप्पा कराड यांनी दर्शन घेऊन आरती केली.
या गौरव यात्रेत महिला, पुरुषासह भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे अमर रहे सावरकर अमर रहे, या सोबतच राष्ट्रभक्तीपर विविध घोषणा देत तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता. अनेकांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, गळयातील भगवे गमचे, भगवे आणि भाजपा पक्षाचे झेंडे, विविध घोषवाक्य लिहलेली फलक रेणापूरकरांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशाच्या गजरात, भजनी मंडळाच्या आणि आराधी मंडळाच्या भक्तीमय वातावरणात निघालेल्या या गौरव यात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती.

रेणापूर शहरात निघालेल्या या गौरव यात्रेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहारे, विजय काळे, चंद्रसेन लोंढे, भाजपाचे लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, रेणापूर तालुका संगायो अध्यक्ष वसंत करमुडे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, कुलदिप सुर्यवंशी, भाजपाचे महेंद्र गोडभरले, भागवत गिते, श्रीकृष्ण पवार, शरद दरेकर, सिध्देश्वर मामडगे, चंद्रकांत कातळे, विठ्ठल कसपटे, शिवाजी उपाडे, उज्वल कांबळे, दत्ता सरवदे, श्रीकृष्ण मोटेगावकर, रमाकांत फुलारी, अनंत सरवदे, माधव घुले, नामदेव बोंबडे, शिवमुर्ती उरगुंडे, किशन क्षीरसागर, रमेश कटके, संजय डोंगरे, शेख अजिम, अंतराम चव्हाण, लखन आवळे, महेश गाडे, उत्तम चव्हाण, राजू आलापूरे, शिवाजी सोमवंशी, मारूती गालफाडे, विजय गंभिरे, धनंजय पवार, विजय चव्हाण, ललिता कांबळे, शिला आचार्य, अनुसया फड, गणेश तुरूप, गणेश चव्हाण, बालाजी फड, नामदेव गोडभरले, प्रल्हाद फुलारी, त्र्यंबक भताने, बबन डोंगरे, नंदूमहाराज कुलकर्णी, अजित पाटील, राजकुमार मानमोडे, प्रमोद कुटवाड, अॅड. श्रीगीरे, अॅड. सुधाकर बोराडे, दिलीप चव्हाण, नरसिंग येलगटे, दत्ता उगीले, धम्मानंद घोडके, अच्युत कातळे, रमेश चव्हाण, हणमंत भालेराव, विरेंद्र चव्हाण, पाटलोबा मुंडे, अजित गायकवाड, दत्ता अंबेकर, प्रकाश गालफाडे, दिनकर राठोड, सदाशिव राठोड, श्रीमंत नागरगोजे, सचिन सिरसकर, योगेश राठोड, लक्ष्मण खलंग्रे, भिमराव मुंडे, गोविंद राजे, पप्पू कुडके, ओम चव्हाण, गोविंद पनगुले, प्रकाश जाधव, बबन भताने, दिगंबर येडले, गणेश माळेगावकर, जगन्नाथ कातळे, कारभारी चव्हाण, संतोष राठोड, अरूण कांबळे, हरी आचार्य, प्रताप भुरे, रमेश वरवटे, रफीक शिकलकर, भरत कापसे, कार्तीक गंभीरे, जगदीश भताने, दिपक पवार, संजय चव्हाण, प्रभाकर डोंगरे, नंदकुमार मोटेगावकर, कालीदास डोंगरे, बाळू पाटील, शेख शफू, विश्वनाथ गाडे, खलील ताशेवाले, गंगाधर पडूळे, जयदिप घोडके, सुरज फुलारी, रोहीत खुमसे, व्यंकट आकनगिरे, भारत राठोड, माधव इगे, मनोज चक्रे, उमाकांत कांबळे, शरद चक्रे, मजहर शेख, समिर शेख, आकाश लकडे, सोपान सातपुते, परमेश्वर मोटेगावकर यांच्यासह नागरिक, महिला, पुरुष, तरुण आदीनी सहभाग घेतला होता.
