आठ वर्षीय जीया मोमीनचा रोजा

आठ वर्षीय जीया मोमीनचा रोजा

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील वंलाडी येथील चिमुकल्या जीया मोमीन या मुलींने बालवयात शुक्रवारी पवित्र रोजा पहिला उपवास केला असुन तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.रोजाच्या काळात दिवसभर उपवास केल्यास सहनशिलता वाढते व त्यातुन तो व्यक्ती ईश्वराच्या जवळ जातो. अशी धारणा आहे. दररोज सुर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत ऊपवास केल्याने मानवातील नकारात्मक भावनांचा त्याग करुन द्वेष, राग, लबाड बोलणे, शिवीगाळ करणे, भांडणतंटे यांचा त्याग करत हा उपवास केला जातो. या काळात दिवसभरात पाच वेळा नमाज पढणे, व सतत ईश्वराचे चिंतन करणे अपेक्षीत आहे. वलांडी येथील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते हसन मोमीन यांची पुतनी व रियाज मोमीन यांची मुलगी जीया मोमीन या चिमुकल्या मुलींने कडाक्याच्या उन्हात रोझाचा उपवास धरुन एक आदर्श निर्मान केला असुन तीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

About The Author

error: Content is protected !!