पालकांनी आपल्या ईच्छा पाल्यावर लादू नये – जी.टी.मुंडे

पालकांनी आपल्या ईच्छा पाल्यावर लादू नये - जी.टी.मुंडे

उदगीर(एल.पी.उगीले) : पालकांनी आपल्या इच्छा अपेक्षांचे ओझे पाल्यावर टाकू नये, पालकांच्या इच्छा आकांक्षामुळे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती आणि प्रयोगशीलता कमी होते, आपल्या घरातील लोक जे सांगतात ते होण्याचा प्रयत्न करण्यात विद्यार्थी स्वत्व हरवतात. असे विचार जी टी मुंडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याला त्याच्या आवडी नुसार शिक्षण घेवू द्यावे, आपली आवड त्यांच्यावर लादू नये,तसेच वेळात वेळ काढून आपल्या मुलांना वेळ द्यावा ,त्यांच्याशी सुसंवाद साधवा.तसेच पालक शिक्षक संवाद ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.असे ही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ. प.ज्ञानोबा मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक जी.एस.सूर्यवंशी ,जी.टी.मुंडे , श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना प्रगती पत्रकाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला शाळेचे सचिव दत्ता मुंडे, काळे मॅडम, मुंडे मॅडम,राठोड मॅडम ,केंद्रे मॅडम, नर्सिंग मुंडे,बालाजी मुंडे,तसेच डोंगरशेळकी, गुडसुर,कल्लुर, इस्मालपुर,खेर्डा , लमानतांडा , डाऊळ – हिप्परगा, नावंदी येथील पालक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्ता मुंडे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!