निवृत्ती रायवाड गुरुजींचा प्रथम स्मृतिदिन साजरा

निवृत्ती रायवाड गुरुजींचा प्रथम स्मृतिदिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : निवृत्ती रायवाड गुरुजी हे एक समाजशिक्षक होते. ते तसे शामलाल हायस्कूलमध्ये सेवक ते शिक्षक असा त्यांच्या नोकरीचा प्रवास पण ते हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शिक्षक होते. त्यांसोबत ते संगीताची आवड असल्यामुळे अनेक भजनी मंडळस सेवा देत. यांच्या ह्या निष्काम समाजकार्याची आठवण सर्व उदगीरकरांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. दि.ली होळीकर प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून प्रतिष्ठानच्या कार्यात त्यांचे मोलांचे योगदान राहिले आहे. म्हणून निवृत्ती रायवाड गुरुजींच्या जाण्याने प्रतिष्ठानचे नुकसान झाले आहे, ते भरून निघणे कठीण आहे. पण त्यांच्या आठवणींची शिदोरी प्रेरणा देत राहील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुमित्रा वट्टमवार या होत्या. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव यांनी रायवाड गुरुजींच्या आठवणी सांगितल्या. अथांग दुःख पचवून सर्वांना सुख देणारा व सर्वांच्या कामासाठी तत्पर असणारा माझा सेवधर्मी मित्र गेला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच याप्रसंगी दीपक बलसुरकर व उषाताई तोंडचिरकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात सुमित्रा वट्टमवार ताई म्हणाल्या, दि.ली. होळीकर सरांच्या सहवासात घडलेला आमचा सहकारी गेला, याबद्दल दुःख व्यक्त करून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरभद्र स्वामी यांनी तर आभार प्रा. डॉ. माधव कांबळे यांनी मानले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!