उद्या परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य दरबार येथे गुरुचरित्र पारायण सोहळा कार्यक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक द्वारा संचलित श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र रामचंद्र नगर महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे उमा चौक मुख्य दरबार उदगीर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त दिनांक 12 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत साक्षात ब्रम्हांडनायक परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरु पुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, मल्हारी सप्तशती पारायण,अखंड नाम- जप – यज्ञ सप्ताह, रक्तदान, वृक्षारोपण,शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक इ. अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ उदगीर शहरातील व परिसरातील भाविक -भक्त,सेवेकरी, कार्यरत सेवेकरी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन बामनपल्ले,विनायक गादा, निवृत्ती जवळे,बंडू काळे,सुनीता हंडरगुळे, विशाखा गादा,राम करेपा,बाबासाहेब देशमुख,गणेश हंडरगुळे यांच्यासह श्री.स्वामी समर्थ सेवेकरी यांनी केले आहे.गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी पूर्ण नाव नोंदणी आवश्यक आहे.संपर्क मोबाईल नंबर –
सचिन बामनपल्ले 9146568165
बाबासाहेब देशमुख 9545612581
महादेव सूर्यवंशी 7620676564
निवृत्ती जवळे 8208142173