माजी मंत्री आ.संजय बनसोडे जपानच्याअभ्यास दौऱ्यासाठी रवाना

माजी मंत्री आ.संजय बनसोडे जपानच्याअभ्यास दौऱ्यासाठी रवाना

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे जपान अभ्यास दौऱ्यावर गेले असून जपान येथे विविध स्थळांना भेटी देऊन तेथील आवश्यक त्या सर्व बाबींचा अभ्यास करून आपल्या मतदारसंघासाठी नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व नेत्यांसह समाज बांधवांनी उदगीर रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना जपान दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाजार समितीचे माजी उपसभापतीची रामराव बिरादार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल बागबंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख मुन्ना पांचाळ, मादलापूर सरपंच उदयसिंह मुंडकर, संघशक्ती बलांडे, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, बाळु सगर, अजहर मोमीन, दयानंद शिंदे, बाळासाहेब नवाडे, व्यंकट वाघमारे, अभिजित औटे, विकास जाधव, आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!