चेअरमन महेश नरवडे यांचा भाजपात प्रवेश

चेअरमन महेश नरवडे यांचा भाजपात प्रवेश

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील मौजे जेवळी येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महेश नरवडे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
लातूर ग्रामीण मतदार संघात विशेषत: लातूर तालुक्यात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयाच्या विकास योजना मंजूर केल्या आहेत. गावोगाव आमदार निधी देऊन विकासाला गती दिली. या सर्व कामांमुळे प्रेरित होऊन जेवळी येथील चेअरमन महेश नरवडे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
चेअरमन महेश नरवडे यांच्यासह गुंडू देवडे, भुजंग काळदाते, बालाजी रत्नपारखी, नागेश कोदरे, मल्लिनाथ रणदिवे अविनाश नरवडे, जयराम होळकर आणि भास्कर होळकर यांचे आ. रमेशआप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, प्रताप पाटील, लक्ष्मण नगीने, राम बंडापल्ले, गोपाळ पाटील, पद्माकर होळकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!