लातूर बाजार समिती निवडणूक; आ रमेशआप्पा कराड आणि अँड.बळवंत जाधव यांच्यात सकारात्मक चर्चा
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अँड. बळवंतराव जाधव यांच्यात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.लातूर बाजार समितीवर वर्षानुवर्ष देशमुखशाही सुरू आहे. या देशमुख शाहीचा अंत करण्यासाठी आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या हितासाठी शिवसेना- भाजपा युती सक्षम पर्याय ठरू शकतो. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अँड. बळवंतराव जाधव यांच्यात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी अँड जाधव यांच्या मातोश्री यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे उपस्थित होते.
