वाढवणा येथे आनंदाचा शिधेचे पत्रकार बिरादार यांच्या हस्ते वाटप

वाढवणा येथे आनंदाचा शिधेचे पत्रकार बिरादार यांच्या हस्ते वाटप

वाढवणा (प्रतिनिधी) : वाढवणा बु येथील स्वस्तधान्य दुकान नंबर २ येथे पत्रकार तथा विधीज्ञ प्रमोद बिरादार यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी “आनंदाचा शिधा” किट चे वाटप करण्यात आले.

राज्य सरकारच्या वतीने गोरगरिबांना सण गोड व्हावा यासाठी सर्वसामान्य स्वस्त धान्य लाभधारकांना केवळ १०० ₹ एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा आणि एक लिटर पाम तेल या चार शिधा जिनसचा संच देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांचा सण आणि मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावा या संकल्पनेतून  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून "आनंदाचा शिधा" किट चे वाटप पत्रकार तथा विधीज्ञ प्रमोद बिरादार यांच्या हस्ते मंगळवारी वाटप करण्यात आले.यावेळी गोर गरिब शिधा धारक हिंदू व मुस्लीम बांधव भगिनी उपस्थीत होते.

About The Author

error: Content is protected !!