नोमान शेख आँलिम्पियाड परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

नोमान शेख आँलिम्पियाड परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी शेख नोमान रफिक अहमद या विद्यार्थ्याने एम.के.सी.एल द्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन ऑलंपियाड परीक्षेत जिल्ह्यात सर्वप्रथम आला आहे.

या यशाबद्दल रोहित इन्फोटेक कम्प्युटर सेंटर चे संचालक उदय बेंबडे यांच्या हस्ते 2500 रू चा धनादेश, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, वर्गशिक्षिका शारदा तिरूके, शबाना शेख ,अश्विनी घोगरे ,त्रिगुणा मोरगे, सतीश साबणे, प्राजक्ता भोसले, सविता पाटील, संजीवनी गुरमे, सतीश साबणे, नंदकुमार मद्देवाड, मंगेश शिवनखेडकर ,युवराज मोरे, भानुदास माने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मुख्याध्यापिका आशाताई रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!