शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे ) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅनलचा प्रचार शुभारंभ श्री क्षेत्र शिरूर ताजबंद येथील प्रभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होत करण्यात आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार बाबासाहेब यांनी नारळ फोडत प्रभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली.
शेतकरी बांधव हा माझा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. आजवर त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढील काळातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्वजण कटिबद्ध आहोत, असे मत अहमदपूर येथील दिपवर्षा मंगल कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समिती, निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पॅनलचा प्रचार शुभारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी पॅनलच्या ताब्यात द्या, असे आवाहन देखील उपस्थित मतदारांना केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव , ह.भ.प उत्तमजी महाराज धानोरकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांबजी महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष शिवाजीदादा देशमुख, शिवसेना ता.प्रमुख विलास पवार, माजी जि.प गटनेते मंचकराव पाटील, काँग्रेस माजी ता.अध्यक्ष माजी जि.प सदस्य ऍड.हेमंतराव पाटील, माजी सभापती चंद्रकांतजी मद्दे, जिल्हा सरचिटणीस इमरोज पटवेकर, काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन, विश्वंभरराव पाटील, शिवाजीराव खांडेकर, शिवसेना शहराध्यक्ष भारत सांगवीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजहर बागवान, संजय जी पवार, तुकाराम पाटील, सुरजभैय्या पाटील, बालासाहेब पाटील आंबेगावकर, अँड.टी.एन.कांबळे, विलासराव पवार, विनायकराव पाटील चोबळीकर, शेखर जाधव, विकास महाजन, प्रशांत भोसले, प्रा.व्ही.एस पवार, माधव पवार, शंकर गुट्टे, युवराजभैय्या पाटील, बळीराम इंगोले, अंकुशराव कानवटे, शाहूताई कांबळे, दिनानाथ राचमाळे, संतोष रोडगे, बाळू केंद्रे, बाळासाहेब साखरे, गोपीनाथ जोंधळे, युवराज घोगरे, प्रताप जाधव, महेश हंबीर, चंद्रकांत गंगथडे, शामराव टीकोरे, बालाजी रोकडे, सतीश नवटक्के, सतीशराव कल्याणी, अविनाश मंदाडे, उत्तमराव देशमुख, रफिक शेख, दिलदार शेख, प्रकाश ससाने, अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, अशोक सोनकांबळे, राजकुमार सोमवंशी, धनराज बोडके, शिवशंकर आगलावे, श्याम देवकते, माधव पवार, अनिल यादव पाटील, अविनाश देशमुख, शार्दुल शेख, सचिन पडिले, मच्छिंद्र वाघमारे, शरद पवार, माधव कासले, शिवा कासले, सुभाष गुंडीले, अजय सुरनर, अनिकेत फुलारी, वामनराव पाटील, बाळू पवार, बाळासाहेब बेडदे, हरिभाऊ कदम सर, बाळु भाऊ केंद्रे, सूर्यकांत चिघळे सर, शिवाजी पवार, विजय पवार, ज्ञानेश्वर शेळके, विष्णू सोमवंशी, बालाजी कातकडे, विजयकुमार लोहारे, व्यंकटराव पस्तापुरे, रामदास कदम, शुभम मुंडे, शैलेश जाधव, खंडू शेवाळे, संतोष कदम, भीमाशंकर दाभाडे, अरुण सूर्यवंशी, मधुकर जगताप तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल व सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
