पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनी विरुद्ध ग्राहक मंच्यात अनिकेत फुलारी यांनी केली तक्रार दाखल
अहमदपुर ( गोविंद काळे ) : शहरातील पुजा इलेक्ट्रॉनिक्स व भारतातील टॉपची गोदरेज कंपनी विरुद्ध ग्राहक अनिकेत फुलारी यांनी वाॅरंटीत असलेला फ्रीज दुरुस्त करून देत नसल्या बाबत ग्राहक मंच्यात केली तक्रार दाखल.
तांबटसांगवी येथील रहिवासी अनिकेत फुलारी यांनी पुजा इलेक्ट्रॉनिक्स येथे दि.१८/०४/२०१८ रोजी १४२००/- रुपयात फ्रिज खरेदी केला त्यावेळी पुजा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक शरद शिवपुजे यांनी गोदरेज कंपनीच्या फ्रिजची माहिती दिली की हा फ्रीज चांगला आहे काॅम्प्रेसरची दहा वर्षांची वाॅरंटी आहे, कमी किंवा जास्त विद्युत पुरवठा आला तर इनबिल्ट स्टॅबलायजर आहे. तो फ्रीज दि. ०१/११/२०२२ रोजी कुलिंग होत नसल्यामुळे बंद पडला त्याची तक्रार पुजा इलेक्ट्रॉनिक्स येथे करण्यात आली त्यानुसार गोदरेज कंपनीचे मेकॅनिक मुनीर यांच्या मार्फत फ्रीज तपासणी करण्यासाठी माणूस गेला त्याने फुलारी यांना कॉम्प्रेसर खराब झाल्याचे सांगितले व फिसच्या नावाखाली ३८०/- रु. नगदी घेतले, काॅम्प्रेसर खराब झाल्याची माहिती गोदरेज कंपनीला ऑनलाईन करा असे सांगितले. दि.०५/११/२२ रोजी तक्रार क्र. ९९७२४४ ऑनलाईन नोंद केली, त्यावेळी कस्टमर केअरने सांगितले की तुमचे ३८०/- रुपये परत मिळतील आठ दिवसांत तुम्हाला नवीन काॅम्प्रेसर वॉरंटीत बसवून देण्यात येईल. अनेकदा पाठपुरावा करून देखील पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनीचा माणूस मुनीर हा फुलारी यांना वाॅरंटीत फ्रीज दुरुस्त न करुन देता त्यांच्याकडे ६५००/- रुपयांची मागणी करत होते. फ्रिज विक्रेते पुजा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक शरद शिवपुजे यांनी तर मी फक्त फ्रिज विक्री करण्याच काम करतो दुरुस्तीच काम करत नाही मुनीर सांगतील तेवढी रक्कम द्या आणि फ्रिज दुरुस्त करून घ्या, यापुढे माझ्याकडे येवू नका, असे फुलारी यांना सांगितले दोघे संगनमताने आपल्या कडून ६५००/- रुपये अडवणूक करून विनाकारण मागणी करत आहेत. वारंवार कस्टमर केअरला फोन करून फायदा होत नव्हता म्हणून अनिकेत फुलारी यांनी थेट ग्राहक मंच कार्यालय गाठले व पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली. सदरील नोटीसीमध्ये अनिकेत फुलारी यांच्या तक्रारीची दखल घेऊन आठ दिवसांत नवीन काॅम्प्रेसर बसवून बंद पडलेला फिरीज दुरुस्त करून देण्यात यावा. जर आपण असे नाही केलात तर माझे तक्रारदार आपणा विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही सक्षम कोर्टात करतील व होणाऱ्या परिणामास आपण स्वता हा जबाबदार राहाल. तसेच नोटीसीचा खर्च रक्कम रुपये २०००/- आपण अनिकेत फुलारी यांना देणे आपणावर बंधनकारक राहील असे नोटीशीद्वारे ॲडव्होकेट अनिल क जवळकर यांनी पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनीला कळवले आहे.
