अहमदपूर जलशक्ती मंत्रालय आणि ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूरात जल जल अभियान
अहमदपूर ( गोविंद काळे) जल है तो कल है, जल हे जीवन आहे. असा मंत्र आपल्या देशात फार पूर्वीपासून जपला जातो. त्यामुळे भविष्यात पुढची पिढी सुखी राहण्यासाठी, पाण्याचे नियोजन करून त्याचे जतन करावे असे आग्रही प्रतिपादन माउंट आबू च्या मधुबन स्थित ओम शांती केंद्राचे राजयोगी ब्र.कु. दत्ता भाई यांनी केले. त दि. 12 रोजी जलशक्ती मंत्रालय आणि ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने ईश्वरीय विश्वविद्यालयात आयोजित जल जन अभियान च्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्राच्या प्रमुख राज योगिनी ब्र.कु.छाया बहिणजी, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून इंडियन नेव्ही दिल्ली संच चे कमांडर शिरीष पावले, जल अभियानाचे किरण भाई, केदार भाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी छाया बहिणजी म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी अन्ना पेक्षाही पाण्याला असाधारण असे महत्त्व असल्याचे सांगून घराघरातून पाणी बचतीचा, पाणी आडविण्याचा व योग्य नियोजन करून पाणी काटकसरीने वापर करण्याचे जाहीर आवाहन केले.
या सोहळ्याला डॉक्टर शिवनाथ पावले, नांदेडचे दत्ता भाई, गोपाळ पडिले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी के जितेंद्र कोहळे यांनी यांनी केले सूत्रसंचालन आशा रोडगे यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
कार्यक्रमाचा शुभारंभ जलगिताने करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी उपस्थिताना जलजन अभियानाच्या निमित्ताने पाणी बचतीची शपथ देण्यात आली. माउंट आबू येते उन्हाळ्याच्या सुट्टीत होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम शांती केंद्राच्या सेवाधारी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
