यशवंत विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

यशवंत विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
 अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची132 वी जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या समयी प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन पर भाषण झाले.

 यावेळी पर्यवेक्षक गजानन शिंदे, राम तत्तापुरे, अरुण मोरे, शिवाजी सूर्यवंशी, भीमराव कांबळे, संतोष मालवदे, प्रा. अनिल चवळे, गौरव चवंडा यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!