सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे आज दि. १४/०४/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त संचालक कुलदीप हाके व संचालिका शिवालिकाताई हाके यांच्या हस्ते प्रतिमीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी बोलताना संपूर्ण भारतभर सर्व लहान-मोठ्या शहरांत आनंद-उल्हासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच बाबासाहेब हे मानवी हक्क चळवळ, राज्यघटनेची निर्मिती, शोषितांचे थोर उद्धारक आणि त्यांच्या प्रकांड विद्वतेसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई विद्यार्थी होते.असे मत संचालक कुलदीप हाके यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन प्रा.संभाजी सांगळे यांनी केले. शाळेच्या प्राचार्या सौ. रुथ चक्रनारायण यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रा.भरत कानवटे, प्रा.शेख मोसिन, प्रा. शुभांगी सूर्यवंशी, प्रा. हीना कल्लुरकर, प्रा. ज्योत्सना स्वामी, प्रा. स्नेहा ओझा, प्रा. अंजली बोधनकर, प्रा. व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author

error: Content is protected !!