शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या – विवेक सुकने

शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या - विवेक सुकने

उदगीर(प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी बाजार समितीत काय कायदेशीर व्यवस्था आहे?शेतीमालाची लिलाव प्रक्रिया कशी केली जाते?अडते आणि खरेदीदाराचे व्यवहार कसे असतात? मार्केट फि का वसूल करतात?हमाल चांगल्या शेतमालातून मातेरे का घेतात? खरेदीदार कडता का मागतो ?मापाडी कुणासाठी काम करतात?याची कसलीही माहिती नसलेले सेवा सहकारी संस्थेचे संचालक आणि ग्रामपंचायतचे सदस्य बाजार समितीचे संचालक मंडळ निवडणार आहेत ,तरी त्या सर्व मतदार बांधवांना विनंती आहे, वरील सर्व प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्यावे. अशी विनंती मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच उदगीर बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवार विवेक सुकने यांनी केली.

महाराष्ट्रातील जवळपास तिनसेसात बाजारसमितीच्या निवडणुका अठ्ठावीस व तिस एप्रिल 2023 रोजी होत आहेत . दरवर्षी बाजार समितीत सोयाबीन,तुर, उडीद, मूग, ज्वारी, गहू,हरभरा,करडी ,भूईमूग,तिळ आदी प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात आणला जातो, शेतीमालाचा आधारभूत किंमती हमीभाव दरवर्षी केंद्र सरकार जाहीर करते.हमीभाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समिती कायद्यातील कलम 32 ड प्रमाणे बाजार समितीच्या संचालक मंडळ व सचिवाची आहे.

शेतकऱ्यांनी शेतमाल मार्केट यार्डात विक्री साठी आणल्यानंतर मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर शेतीमालाचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून त्याची शेतकऱ्यांला आवक पावती द्यावी, अशी बाजार समितीच्या कायद्यात तरतूद आहे. शेतकऱ्याचे नाव ,गाव, आणि वजनासह पावती दिली तर शेतकऱ्यांला आधारभूत किंमत मिळविणे कायद्याने शक्य होणार आहे. याची कसलीही माहिती ग्रामपंचायत सदस्य आणि सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांना नाही, असे मतदार शेतकऱ्यांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत,तरी मतदार बांधवांनी बाजार समितीतील व्यवहाराची , कार्यपद्धतीची माहिती घ्यावी, शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात का? याची पडताळणी साक्षर मतदारांनी करावी . कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या, शेतकऱ्यांविषयी कळवळा असणाऱ्या , उमेदवारांना निवडून द्यावे. असे आवाहन विवेक सुकने यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!