हातात हात धरून पुढे जाण्यात सर्वांचे हीत – दिलीपराव देशमुख
देवणी(एल.पी.उगीले) : हातात हात धरून सर्वांनी पुढे जाण्याचे काम केले पाहिजे, यामध्येच सर्वांचे हीत आहे. एकमेकांचे पाय ओढण्याने कुणाचेही हीत होत नाही. तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या गजानन भोपणीकर यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली पाहिजे, असे प्रतिपादन सहकार महर्षी, माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केले. देवणी येथे जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणीच्या नूतन शैक्षणिक इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
जनसेवा सेवाभावी संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर साहेब ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्रिंबकनाना भिसे, गोविंदराव भोपणीकर (सरचिटणीस लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी), जागृती कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणरावजी मोरे, श्रीशैल्य उटगे (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, लातूर) लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संभाजी रेड्डी (संचालक जागृती साखर कारखाना), पृथ्वीराज शिरसाठ (संचालक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, लातूर), दिलीप पाटील, भगवानराव पाटील विजयनगरकर, देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित बेळकोने, रामराव बिरादार भोपणीकर, मधुकर लांडगे,कुशावर्ता बेळे ( माजी महिला व बालकल्याण सभापती) शिवाजी कांबळे, सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव गजानन भोपणीकर यांनी केले. रसिका शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केजी टू पीजी पर्यंत देण्यात असलेल्या दर्जेदार शिक्षणाची माहिती दिली. तसेच गोविंदरावजी भोपणीकर यांनी मनोगत व्यक्त करताना या संस्थेच्या निर्मिती मागील उद्देश व मागील 12 वर्षात संस्थेने केलेले शैक्षणिक कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली, व या संस्थेच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलीपरावजी देशमुख यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अशोकभैया निलंगेकर म्हणाले की, निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ या तिन्ही तालुक्याच्या विकासासाठी विकासरत्न लोकनेते विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या विचाराचा व कार्याचा वसा आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे, आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सर्वांनी ध्येयातून कार्य केले पाहिजे. तरच सर्वांगीण विकास साधता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच या शैक्षणिक संस्थेच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा लोहकरे यांनी केले आभार प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी केले.
